*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
मुस्लिम समाजाबाबत व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी धाराशिव चे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत असे की
मागील कांही दिवसापासून राज्यात मुस्लीम समाजाबाबत व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करुन मुस्लीम बांधवाच्या धार्मिक भावना दुखावणारे व सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्य कांही मान्यवर व्यक्ती करीत असल्याचे दिसून येत आहे. हे अत्यंत चुकीचे व राज्यातील सामाजिक शांतता भंग करणारे आहे.
तरी मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यांवर
कायदेशिर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून देऊन राज्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा राखण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
धाराशिव- लोकसभा सदस्य-
(ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पबन राजेनिंबाळकर)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा