इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
---- लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्गाह हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांच्या ३१ व्या उरूस उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रविण भैय्या माने यांनी गाजी - ए - मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी बाबांच्या मजारवर चादर चढवून दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व कमिटी सदस्यांशी प्रविण माने यांनी संवाद साधला तसेच उत्सव कमिटीच्या वतीने प्रविण माने यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यभर हा दर्गाह प्रसिद्ध असून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या जोधपुरी बाबांच्या दर्ग्यावर हिंदू - मुस्लिम भाविक मोठ्या भक्तीभावाने वर्षभर व उरूसला हजेरी लावत असतात.
प्रविण माने यांच्या भेटी प्रसंगी मोहन काटे, बाळासाहेब कोकाटे, राजूभैय्या शेख, सुरेश कोकाटे, नागेश गायकवाड, नवनाथ कोकाटे, सनी बंडगर, गणेश मोहिते, शाहेजमान शेख, नियाज़ शेख, वाहिद सय्यद, शरीफ शेख, जाकिर पठान, मुजावर आदम, अहमद शेख, यासीन काजी, जाबिर पठान, सद्दाम काझी, रिजवान मुलानी, रीयाज सय्यद, उस्मान गनी शेख, मुस्तकिन शेख, रियासत पठान, आसिफ शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा