*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात १४ सप्टेंबर 'हिंदी दिवस' उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अमोल फुले सर, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद, भारत शिंदे, अभिरूप हिंदी साहित्यिका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहावी 'ड'वर्गाने केले. प्रास्ताविकात पोपट निंबाळकर यांनी हिंदीभाषेचे महत्व, साहित्याचे योगदान, 'राष्ट्रभाषा' म्हणून असलेला दर्जा याविषयी माहिती सांगितली.
विद्येची देवता सरस्वती, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील या प्रतिमांचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
'हिंदी दिवसा'चे औचित्य साधून मंचावरील सर्व मान्यवरांचा व हिंदी अद्यापकांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक मनोगतात शिवाजी थिटे सर यांनी तर विद्यार्थी भाषणात कु. अपेक्षा नलवडे हिने आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष फुले सर यांनी सर्वांना 'हिंदी दिवसा'च्या शुभेच्छा देऊन हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश सांगितला.
याप्रसंगी पर्यवेक्षक उमेश बोरावके, धनंजय मगर, भीमाशंकर पाटील, शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव, राजाराम काळे, श्रीमती प्रमिला राऊत, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु.केतकी गाजरे हिने केले तर आभार कु.वैष्णवी घोगरे हिने मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा