Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

*अकलूज नगर परिषदेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना जाहीर आवाहन*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

अकलूज नगरपरिषद वतीने अकलूज शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार साहित्य खरेदी करण्यासाठी 3000/- रू पर्यंत शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे.

त्यांनी वयाचे  65 वर्ष पूर्ण केलेले असावेत. तसेच लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख आत असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अकलूज नगरपरिषद मदत कक्षाशी संपर्क साधावा तसेच भरलेले फॉर्म नगरपालिका कार्यालय अथवा आशा वर्कर्स यांचेकडे सादर करावे असे आवाहन अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी गोरे साहेब यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा