*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;-9730 867 448
*"तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना बचाव समिती "---शेतकरी सभासदांना जागे व्हा ........*
*---- अमोल शिवाजीराव जाधव*
१) कारखान्याचे एम.डी. यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना वारंवार बंद झाला त्यामुळे कारखान्यामधील कामगारांचे संसार उध्वस्त झाले. आणी त्यामुळे कारखान्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली, औषधोपचारासाठी सुध्दा पैसा जवळ नसल्यामुळे जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी अत्महत्या केली, तर मग याला जबाबदार कोण?
२) १९९४-९५ सालामध्ये डिस्टलरी चा प्रकल्प चालु करण्यासाठी तालुक्यातील उस उत्पादक यांचेकडुन प्रति टन ११४ प्रमाणे सलग तीन वर्ष कपात करण्यात आली व तीच रक्कम व्याजासह परत देण्याचे ठरले होते मात्र ती रक्कम अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. ही शेतकऱ्यांची कपात केलेली रक्कम कुणाच्या घशात गेली ?
३) २००९ पासुन च्या कालावधीत निवडणुकीचा पुर्ण कार्यक्रम झाला होता, तरी सुध्दा संबंधीत कारखान्यातील अधिकाऱ्यांनी निवडणूक फीस भरणा केली नाही, याला जबाबदार कोण ?
४) वनविभागाची जमीन गट नं. १४६ व गट नं. १५९ ही जमीन १९८१ पासुन तु.भ. कारखान्यास ९९ वर्षाच्या कराराने दिलेली आहे, परंतू ही जमीन २०२३ पर्यंत वनविभागाच्या नावे होती ती जमीन दि.२६/०३/२०२३ ला तुळजाभवानी कारखान्याच्या नांवे कशी झाली ? याला जबाबदार कोण?
तसेच श्री सभापती खंडोबा पणन सहकारी संस्था, अणदूर खरेदी खत न करता २ हेक्टर जमीन त्या संस्थेच्या नावे कशी करण्यात आली, अशा पध्दतीचा व्यवहार करता येतो का? यास जबाबदार कोण ?
५) लोकमंगल समुह यांना तु.भ. कारखाना चालविण्यास दिला होता, तो कारखाना मध्यंतरी दोन वर्षात बंद कशामुळे केला? याला जबाबदार कोण ? लोकमंगल यांचेकडे असलेले कारखान्याचे व कामगारांचे येणे का वसुल केले नाही ?
साखर आयुक्त पुणे यांनी आपल्या बाजुने न्याय दिला असल्याने तो न्यायालयात जावून निकाल लावून का घेतला नाही, यास जबाबदार कोण ?
दृष्टी शुगर इंडस्ट्रीज संचलित श्री तु.भ. साखर कारखाना चालवण्यास घेतला होता, तो सुध्दा २ वर्षात बंद करण्यात आला. त्यांच्याकडुन कारखान्याचे येणे रकमा होत्या त्यावर साखर आयुक्ताचा पुतण्यांनी निकाल दिला होता त्यावर जिल्हा कोर्टात जावून निकाल का घेतला नाही यास जबाबदार कोण?
६) सन २०२२-२३ मध्ये श्री तु.भ. कारखाना १२५ टन भंगार साहित्य विकणे आहे असे जाहिर प्रगटन वर्तमानपत्रात केले होते ते संबंधीत अधिकाऱ्यांनी विक्री केली त्याचे पैसे कुठे गेले? कुणास दिले? यास जबाबदार कोण ?
७) श्री तु.भ. कारखाना भाड्याने गोकुळ शुगर इंडस्ट्रीज यांना १५ वर्षांकरीता दिलेला आहे. सन २०२३-२४ चा हंगामामधील ऊस कारखान्यास तुळजापूर तालुक्यातील व गेटकेन शेतकऱ्याचा ऊस गाळपास आणला होता, मनातील शेतकऱ्यास प्रति टन २८०० भाव दिला व गोरगरीब शेतकरी यांना २३०० रू. भाव दिला, यास जबाबदार कोण?
आपला
अमोल शिवाजीराव जाधव 7875296111,8208363136





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा