Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

*ॲड,- गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनल कडून बोलवण्यात आलेली एस टी बँकेची सभा उधळली...*

 


*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलकडून बोलावण्यात आलेली भंडा-यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा चांगलीच वादळी ठरली असून प्रचंड गदारोळानंतर ही सभा संपली. 

या सभेत पोलिसांवर खुर्च्या फेकण्यात आल्या आणि एकमेकांना धक्काबुक्की झाली. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव विरोधकांनी मांडला तर मारहाण केल्याप्रकरणी सदावर्तेंच्या समर्थकांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली.

एसटी महामंडळ कर्मचा-यांंच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७१ वी सर्वसाधारण सभा भंडा-यात आयोजित करण्यात आली होती. अ‍ॅड. सदावर्ते यांच्या पॅनलकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिका-यांनी ही सभा अक्षरश: उधळून लावली. 

वार्षिक विशेषांकावर सत्ताधा-यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र यांच्यासह नथुराम गोडसे यांच्या छायाचित्र लावल्याचा मुद्दा रेटून धरत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधा-यांना धारेवर धरले.

यावेळी वाद वाढला आणि विरोधकांनी अक्षरश: अहवालाची पुस्तके फाडून फेकली. यावेळी एकमेकांना धक्काबुकी करत खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच खुर्च्याही फेकून मारल्या. 

यावेळी सत्ताधा-यांनी ही सभा तहकूब केली. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली तर विरोधकांनी सदावर्ते यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहारावरून फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ठराव पारित केला. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा