*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार यांनी बिन शेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी एक हजार पाचशे रुपयाची मागणी करून सदर रक्कम कार्यालयात स्विकारताना रंगेहात पकडले आहे.या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई बाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी माळशिरस नगरपंचायत हद्दीत खरेदी केलेल्या बिन शेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी विकास पवार यांनी माळशिरस नगरपंचायत शासकीय फी व घरपट्टी २७८०/- व्यतिरिक्त १५००/- रुपये लाच रक्कम असे एकूण ४२८० रुपये मागणी करून सदर रक्कम त्यांनी माळशिरस नगरपंचायत कार्यालयात स्वीकारले असल्याने त्याना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द माळशिरस पोलीस ठाणे येथे गुन्हा नोद करण्यात आला आहे.सदरची कामगिरी अमोल तांबे पोलीस अधीक्षक ला.प्र.वि, पुणे डॉ.शितल जानवे अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा पथक गणेश कुंभार पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि सोलापूर, सपोफौ कोळी,पोह सोनवणे,घुगे, गायकवाड यांनी कारवाई केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा