Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

*सांगोला तालुक्यातील' जवळा येथील दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा अद्याप तपास झाला नसल्याने चर्चेचा विषय?*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मिसींग खबर ता 23/08/2024 6600274510 मी बिरा शामराव बर्वे वय 45. धंदा शेती रा.बर्वे वस्ती जवळा ता.सांगोला जि. सोलापूर मी हजर राहून जवाब देतो कि (मो.नं.8600274510,) मी माझी पत्नी मनिषा मुलगा सुरज, शितल श्याम बर्वे वय 19 वर्ष रा. बर्वे वस्ती जवळा ता. सांगोला येथे एकत्रित राहण्यास असून आम्ही शेती व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका करतो माझा मुलगा श्याम व सून शितल यांचा विवाह दिनांक 23/07/2024 रोजी झालेले असून तेव्हापासून सुन शितल आमच्याकडेच राहण्यास असून आज दि 23/08/2024 रोजी सकाळी 08/00 वाजण्याचे सुमारास माझी पत्नी मनीषा ही सून शितल हीच आंघोळ करण्याकरिता सून हिच्या खोलीत तिला उठवण्यासाठी गेली शितल हिचा खोलीचा दरवाजा उघडा दिसल्याने मी व माझी पत्नी मनीषा असे दोघे मिळून खोलीत जाऊन बघितले तर सुन शितल खोलीमध्ये दिसली नाही आम्ही तिच्या घराच्या आजूबाजूस व गावात शोध घेतला परंतु शितल कोठेही दिसून आली नाही त्याबाबत मी शितल चे वडील हनुमंत शामराव खरात यांना फोन करून कळविले ते घरी आल्यानंतर आम्ही सुन शितल हिचा आजूबाजूला व नातेवाईक आणि गावामध्ये शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही म्हणून सदर बाबत माझी सून शितल ही बेपत्ता झाल्याबाबत खबर देण्याकरिता सांगोला पोलीस ठाणे येथे आलो तिचे वर्णन खालील प्रमाणे 

नाव -शितल श्याम बर्वे ,वय 19 वर्ष- बर्वे वस्ती जवळा ता. सांगोला जि. सोलापूर-- अंगात नेसणेस पोपटी कलरचा टॉप व काळ्या रंगाची पॅन्ट, रंग गोरा ,रंगाने सडपातळ, शिक्षण 12वी, उंची 5 फूट, भाषा मराठी, दिनांक 23/ 8 /2024 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुन शितल श्याम बर्वे वय वर्ष 19

 रा. बर्वे वस्ती -जवळा ता. सांगोला जि.सोलापूर हे राहते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे तरी तिचा शोध होणेस विनंती आहे माझा वरील संगणकावर टाईप केलेला जवाब मी वाचून पाहिला तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे समक्ष हा जवाब टाईप केला स.ता.म. (पोलीस नाईक/ 402 वाकी टोळ )पोलीस ठाणे अंमलदार पोलीस ठाणे सांगोला येथे हरवल्याची तक्रार दिनांक 23/ 8/ 2024 देण्यात आलेली आहे          


                      मात्र दोन महिने झाले अद्याप हरवलेल्या विवाहितेचा तपास न लागल्याने सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे या विवाहितेचा तपास लवकर न लागण्यास आणखी अशा प्रकारे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे नागरिकांतून बोलले जात असून त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वासर्हता कमी होत असून ही बाब चिंताजनक आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा