*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पुणे :-- बेकायदेशीरपणे गांजा बाळगणार्या तिघांना पकडून गुन्हे शाखेच्या पथकांनी १ किलो १२९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश मधुकर वाळुंजकर (वय ३६, रा. वनराज मित्र मंडळाजवळ, शुक्रवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
शुक्रवार पेठेतील वनराज मित्र मंडळाजवळ गणेश वाळुंजकर हा दुचाकीसह रविवारी सायंकाळी पाच वाजता थांबला होता. पोलिसांनी संशयावरुन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे १७ हजार ४० रुपयांचा ८५२ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याबरोबरच १ हजार ५० रुपये रोख, दुचाकी असा ६८ हजार ९० रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
तर दुसऱ्या गुन्ह्यात, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमिरखान सुधाखान पठाण (वय ४५), शेरखान पठाण (दोघे रा. बिसमिल्ला हॉटेलचे समोर, लोणी रेल्वे स्टेशन गेट जवळ, लोणी काळभोर) यांना अटक केली आहे. लोणी काळभोर मधील लोणी रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर आरोपी हे स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता बेकायदेशीरपणे ५ हजार ५४० रुपयांचा २७७ ग्रॅम गांजा जवळ बाळगुन विक्री करत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा