*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या २५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३५ नामनिर्देश पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.
६ उमेदवारांनी प्रत्येकी २ अर्ज भरलेमुळे २९ उमेदवारांचे ३५ अर्ज दाखल झाले.मंगळवारी निवडणूक कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.मुख्य पक्षाशिवाय अनेक जण शक्ति प्रदर्शन करत अर्ज भरायला उमेदवार येत होते.मात्र प्रत्येक उमेदवारामागे केवळ पाच लोकांना सोडले जात होते.चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे राज कुमार,प्रहार जनशक्तीचे त्रिभुवन धाइंजे,भाजपचे राम सातपुते, संस्कृती सातपुते,ज्ञानेश्वर काटे, किशोर सुळ,आर.पी.आय. आठवले गटाचे नंदकुमार साळवे,एन.एस.पी चे डॉ सुनील लोखंडे,तसेच अनिल नवगिरे (अपक्ष),नागेश जाधव (अपक्ष), सुधीर पोळ (अपक्ष), त्रिभुवन धाईजे (अपक्ष), कुमार लोंढे (अपक्ष),अतुल सरतापे (अपक्ष), शरद सावंत (अपक्ष),दादा लोखंडे (अपक्ष),प्रकाश नवगीरे (अपक्ष),अनिल साठे (अपक्ष), शैलेश कोतमिरे (अपक्ष),धनंजय साठे (अपक्ष),किशोर सुळ (अपक्ष),उत्तम जानकर (अपक्ष), विकास धाईंजे (अपक्ष) यांनी आज अर्ज दाखल केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा