संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज मध्ये हल्ली दुचाकी चार चाकी वाहनांची संख्या वाढल्याने आणि काही खराब रस्त्यांचा अपवाद वगळता काही रस्ते व्यवस्थित झाल्याने वाहन चालकावर वेगाचा ताबा राहिलेला दिसत नाही दुचाकी वाहन असो अथवा चार चाकी वाहन असो वाहन चालक शहरातून सुद्धा भरगाव वेगाने सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत त्यामुळे अकलूज शहरात वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अलीकडच्या काळात ड्रिंक अँड ड्राईव्ह करण्याचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे ड्रिंक करणारे वाहन मात्र चालवतात ते स्वतः बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात शिवाय अपघातानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी अपघात झालेल्या दोन्ही वाहनधारकात मारामारीचेही प्रकार घडत आहेत विशेषतः टेंभुर्णी रोडवरील कर्मवीर चौकात वारंवार दिवसातून एक तरी अपघात होत आहे" दैव बलवत्तर"म्हणून अलीकडच्या काळात अद्याप जीवित हानी झाली नाही मात्र दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी कर्मवीर चौकात एका तासाच्या अंतराने तीन अपघात झाले आणि वाहनधारक व प्रवाशांना दुखापत झाली अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार विनंती करून निवेदन देऊन कर्मवीर चौकातील बायपास रोड ,तसेच अकलूज शहरात जाणारा रोड , महाळुंग कडे जाणारा रोड ,व माळीनगर टेंभुर्णी कडे जाणाऱ्या रोडवर गतिरोधकाची अत्यंत गरज असून गतिरोधका अभावी वाहने वेगाने चालवल्याने वारंवार अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणून-बुजून डोळे झाक करत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे?
बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास आणि गतिरोधक न बसवल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जीवित हानी झाल्यानंतरच बांधकाम विभागाचे डोळे उघडतील काय? असाही संतप्त सवाल वाहनधारक व प्रवाशातून होत आहे, तरी कर्मवीर चौकातील चारही रोड वरती गतिरोधक बसवून होणारे अपघात टाळावे अशी मागणी वाहनधारक व प्रवाशातून होत असून याबाबत उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा