अकलुज ------प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथे अकलूज नगर परिषद स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना,ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अकलूज येथे गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुंभार,अकलूज नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी जयसिंग खुळे व त्यांचे सर्व सहकारी जेष्ठ नागरिक संघटनेचे सतेज दिवटे, ननावरे सचिव उत्कर्ष शेटे, सत्यजित गायकवाड,अनिल अन्नदाते गुरुजी,नेताजी माने, सूर्यकांत कुरुडकर,दादा राऊत, महादेव दळवी,सुधाकर कुंभार, महादेव पाटील,महाबळेश्वर कुंभार उपस्थितीत होते यावेळी महात्मा गांधी की जय...जय जवान जय किसान...अशा घोषणा देऊन जेष्ठ नागरिक संघाचे अनिलअन्नदाते यांनी महात्मा गांधी विषयी स्वातंत्र्य सैनिक काही स्वर्गीय रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी यांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील गांधीजी तुम्ही आज हवे होता हा लेख वाचून दाखविला तर चंद्रकांत कुंभार यांनी आपल्या मनोगतात महात्मा गांधींनी अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी १९६५ मधील भारत पाकिस्तान युद्ध व अन्न टंचाईचे दरम्यान शेतकरी व सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जय जवान जय किसानचा नारा दिला.आज या महान नेत्यांच्या विचारांची गरज देशाला आहे असे सांगितले
शेवटी महादेव दळवी यांनी आभार मानले.अकलूज नगर परिषदेचे कर्मचारी बाळू वाईकर, अनिल काशीद स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सर्व सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघ चे सर्व सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा