*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451
अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च द्वारा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, पुणे. (अभ्यासकेंद्र क्र.६२२५८) हे अभ्यासकेंद्र मागील १७ वर्षांपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवीत आहे, या अभ्याक्रमांचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा उदघाटन समारंभ अभ्यासकेंद्रात आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून मा.प्रा.डॉ.दिपाली पाटील (प्राचार्या समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालय,पुणे) प्रमुख पाहुणे डॉ.व्ही.बी.गायकवाड (विभागीय संचालक, य.च.म.मु.विद्यापीठ, विभागीय केंद्र,पुणे.) विशेष अतिथी म्हणून .संतोष वामन (कक्ष अधिकारी,य.च.म.मु.विद्यापीठ,विभागीय केंद्र,पुणे) व .उत्तम जाधव (प्रशासकीय सल्लागार य.च.म.मु.विद्यापीठ,पुणे विभागीय केंद्र,पुणे) तसेच संस्थेचे विभागीय संचालक .दगा मोरे,उपसंचालिका लेखा अर्चना फलके व केंद्रसंयोजक गोविंद सुर्यकांत नामदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले तसेच अभ्यासकेंद्रावरील समंत्रक व शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. मा.प्रा.डॉ.दिपाली पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थांचे कौतुक केले व आपल्या मार्गदर्शनात १) विद्यार्थांना स्वतः मधील कैशल्य ओळखता आले पाहिजे. २) विद्यार्थांनी समाज उपयोगी असले पाहिजे ३) आपले आदर्श जे आहे हे तपासले पाहिजे व त्याप्रमाणे पुढे गेले पाहिजे या शिक्षणाच्या त्रिसूत्री बाबत माहिती दिली तसेच डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थांसाठी कसे लवचिक आहे व नवीन शैक्षणिक धोरणामुळे या पुढे विद्यार्थांना एकाच वेळी दोन पदवी कशी घेता येणार आहे याबात माहिती दिली. तसेच संस्थेचे विभागीय संचालक .दगा मोरे यांनी संस्थेत चालणाऱ्या विविध अभ्याक्रमाविषयी व प्रकल्पा विषयी माहिती विद्यार्थांना दिली.
कार्यक्रमास .दिनकर बुरुंगले, दत्तात्रय ठोसर, .सागर घेवडे, .विक्रांत चावक, .दिलीप भोसले, श्री.सुर्यकांत शिंदे, .संजय गौड, शुभम जाधव, रोहित फडतारे, निकिता खांडेकर आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंयोजक गोविंद सुर्यकांत नामदे यांनी केले व .समीर मुरुकटे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा