*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
------ इंदापूर विधानसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून परिवर्तन अटळ आहे. यापुर्वी हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांना संधी दिली असून मला फक्त पाच वर्षे संधी देवून बघा तुमचा सेवक म्हणून काम करेन, बाबींवर देवाचा गुलाल हातात घेवून सांगतो आता माघार नाही असे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती व सोनाई परिवाराचे संचालक प्रविण भैय्या माने यांनी विराट जनसमुदायाच्या साक्षीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
इंदापूर येथील जुनी मार्केट कमिटीच्या प्रांगणात विराट शक्ती प्रदर्शन करत प्रविण भैय्या माने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांच्याकडे आपला अपक्ष अर्ज दाखल केला. यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने, बाबासाहेब चौरे, विष्णुकुमार माने, विधीज्ञ बापुसाहेब साबळे, आझाद मुलाणी, रामदास बनमुडे, पुंडलिक धुमाळ, बिलास घोळवे, रविराज भाळे, विजया कोकाटे, नवनाथ माने, पप्पु फडतरे, शरद चितारे, राजेंद्र भोळे, तानाजी धोत्रे, यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक दादासाहेब थोरात तर आभार बापु जामदार यांनी मानले. यावेळी मनोहर दुके, राजेश जामदार, अमोल मुळे, जोतीराम पेटकर, विकास खिलारे, नागेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रविण भैय्या माने पुढे म्हणाले, समोर खासदार शरद पवार व अजित पवार यांच्या सारख्या बलाढ्य शक्ती असून आपणाकडे सर्वसामान्य जनता आहे. जनता सर्वश्रेष्ठ असून आत्ताची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. सकाळी लवकर घरातून बाहेर पडून कुलदेवता सह विविध देवांचे दर्शन घेण्यासाठी जाताना घरी कोणीही नव्हतं, पण मी जेव्हा दर्शन घेऊन घरी आलो. तेव्हा माझी गाडीही गेटमधून आत जात नव्हती इतकी गर्दी जमली होती. लोकांचं हे प्रेम बघून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आले. यावेळी उपस्थित समर्थकांनी प्रवीण माने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत माने यांना आधार दिला. आपल्या समोर शरद पवार साहेबांचा पक्ष आहे तर दुसन्या बाजूला अजितदादांचाही पक्ष आहे. त्यांच्याकडे मोठमोठे नेते आहेत, संघटना आहे, गावोगावी पुढारी आहेत. आपल्या कडे फक्त तुमच्या सारखी सामान्य जनता आहे. सर्व नेते एका बाजूस असताना याच जनतेने लोकसभेत परिवर्तन करून दाखविले. त्यामुळे जनतेच्या ताकदीच्या जोरावर आपण निवडणूक लढवून निश्चित जिंकणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी प्रविण यांनी बाबीर देवाचा गुलाल उचलुन उमेदवारी अर्ज भरत असुन भरलेला अर्ज पाठीमागे घेणार नसल्याचे सांगताच प्रविण माने यांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी केलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा अनुपस्थित होते. मात्र शहर फेरीत प्रविण माने यांनी गोकुळदास शहा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व शहा परिवाराचे आशीर्वाद घेतले. अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकत्यांशी संवाद साधताना प्रवीण माने हे भावनिक झाले. व्यासपीठावर असलेले त्यांचे वडील, सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथ माने व प्रेक्षकांमध्ये
बसलेल्या त्याच्या मातोश्री यांना देखील रडू कोसळलं.
दशरथ माने कुटुंबाने इंदापूर तालुक्यात सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठे जाळे विणले आहे. लोकसभा निवडणुकीत माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र ऐन मतदानाच्या तोंडावर अचानक त्यांनी सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर माने यांनी अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. परंतु हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने प्रवीण माने यांचा पत्ता कट झाला. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी शरदवंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने हे निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक तिरंगी बनती आहे.
यावेळी सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने म्हणाले, सन १९९५ चा इतिहास आहे, अपक्ष लढणारा विजयी होतो. त्यामुळे प्रविण आमदारकीला निश्चित निवडून येईल. सरकार बनावायला त्याची गरज भासेल. त्यामुळे पुन्हा इतिहास घडणार असल्याने याचे साक्षीदार बनून प्रविणला बहुमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा