Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

*अकलुज येथे "आयुर्वेदिक" चिकित्सा शिबिराचे आयोजन*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी


अकलूजमधील धन्वंतरी आयुर्वेदिक केंद्र मार्फत अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात काॅम्प्युराईज्ड फुल बाॅडी चेकअप तसेच आयुर्वेदिक चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती सौ.सुप्रिया मुदगल यांनी दिली.

           आज घरोघरी वाढते कॅन्सर,हार्ट अटॅक,शुगर,बीपी,बी १२/डी ३कमतरता,पोटाचे आजार,केसाचे आजार,स्किन आजार,गुडघे दुखणे,हात पाय गळणे असे वाढते विविध आजारांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२५ आक्टोंबर रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.आरोग्य हीच आपली संपत्ती आहे त्यामुळे अनेक आजारातून मुक्त होण्यासाठी उत्तम आरोग्यासाठी ही संधी सोडू नका.दिवाळीच्या मुहूर्तावर आरोग्य अभियान म्हणून केवळ १०० रुपयांमध्ये आयुर्वेदाचार्य पुरस्कार प्राप्त २५ वर्षापासून आयुर्वेदामध्ये तज्ञ असलेल्या डॉक्टरांमार्फत ही तपासणी केली जाणार आहे. 

        या शिबिरात फुफ्फुस रोग,हृदयरोग यकृत रोग, वृक्करोग (किडनी), मुळव्याध,मेंदूचे आजार, मुतखडा,हाडांची ठिसुळता, मधुमेह,थायरॉईड,अंतस्रावी, ग्रंथीचे विकार,त्वचारोग, डोळ्यांचे विकार इत्यादी आजारांवर रामबाण उपाय या शिबिरात केले जाणार आहेत.

स्थळ-कुरूडकर बिल्डिंग शासकीय विश्रामगृहासमोर नवीन बसस्थानक जवळ महर्षी चौक या ठिकाणी दि.२५ आक्टोंबर रोजी सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे.तरी गरीब व गरजू रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे नांव नोंदणीसाठी संपर्क


 सौ.सुप्रिया मुदगल मोबाईल नंबर ९६८९ ७९३५४० संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा