Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

*पृथ्वीराज पाटील एकाकी पडलेत का?*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार)* 

*सांगली*

*मो :-8983 587 160

युद्ध करायचे असेल तर शस्त्र ,सैनिक आणि जनता हे सोबत असायला हवे ,जर युद्धात "शस्त्र" नसतील तर पराभव अटळ असतो.

आज माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासारखे सुपरसाईन हायपर मिसाईल पृथ्वीराज पाटील यांच्याकडे नसल्यामुळे विधानसभेचे युद्ध कसे लढायचे ??? याबद्दल सांशकता निर्माण झाली आहे .

एकीकडे जितेश कदम, नातेसंबंध आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष ,अशा द्विधामनस्थितीत विश्वजीत कदम सापडले असावेत का ??

दुसरीकडे ज्या जयश्री पाटील यांनी "लोकसभेत" पायाला भिंगरी लावत 265 सभा घेऊन सांगली पिंजून काढली आणि विशाल पाटील यांच्या विजयासाठी "जीवाचे रान" केले तेच विशाल पाटील जयश्री वाहिनी साठी त्यांच्या सोबत नाहीत. 

त्यामुळेच आज काँग्रेस साठी तन - मन -धन लावून सेवा करणारे पृथ्वीराज पाटील हें एकाकी असल्याचे धक्कादायक चित्र दिसतं आहे.

काँग्रेस पक्षासाठी तिकीट "दोघांनी" आणून देखील त्यांचे प्रचारात सक्रिय नसणे हें "संशयास्पद" नाही का ???

सांगलीच्या अनेक निवडणुकीत ,ज्या मदनभाऊंच्या एका नजरेने "तिकीट वाटप" झाले,ज्यांच्या एका इशाऱ्याने कार्यकर्त्यांना रंकाचे "राव" झाले,त्या मदनभाऊंच्या घरात, दस्तरखुद्द जयश्री पाटील यांना तिकीट नाकारले जाणे,खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत स्टेजवर अथवा तिकीट अर्ज भरताना नसणे हें कशाचे "द्योतक" आहे?? यंदाच्या निवडणुकीत "बळीचा बकरा" बनविण्याचे षडयंत्र रचले गेले आहे का ???

    *पृथ्वीराज पाटील यांच्यामुळे 10 वर्ष काँग्रेस पक्ष जिवंत !* 


मोदी पर्वाच्या उदयानंतर "काँग्रेस कमेटी" ही धूळखात बंद पडली होती. विधानसभेचे तिकीट मागायला अथवा निवडणुकीत लढायचे कोणाचे धाडस नव्हते ,अशा कठीण प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांना टक्कर देत 87 हजार, जी मदनभाऊ पाटील यांच्यापेक्षा जास्त मते विधानसभा निवडणुकीत मिळवली. आज पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या 10 वर्षाच्या कामाच्या बळावर. विधानसभेत शड्डू ठोकला आहे. सांगलीकर "जनतेचा" पाठींबा किती मिळतो यावर त्यांचे "भवितव्य" अवलंबून आहे .

मदनभाऊंचे कट्टर कार्यकर्ते, आणि महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी तात्काळ दूर करून त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक आहे. तरच काँग्रेसचा "विजय" साकार होईल आणि विजयी पताका फडकेल.


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा