Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

*बावडा येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. १०३५ जणांची तपासणी तर ७२५ जणांना चष्म्याचे वाटप, ३० जणांची शस्त्रक्रिया करण्यात येणार*

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

-----

इंदापूर तालुक्यातील बावडा येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास बावडा व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत १०३५ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ७२५ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर ३० नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 


प्रविण माने यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मोजकेच काही दिवस शिल्लक राहिले असून तालुक्यातील सर्व गरजू नागरिकांनी या शिबिराचा लवकर लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रवीण माने यांनी केले.


बावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अंकुश दोरकर, नागेश गायकवाड, भागवत जाधव, यांनी आयोजन केले होते. तर निलेश रंधवे, छगन बनसुडे, डॉ. शरद शिर्के, तमन्ना मॅडम, डॉ. संतोष रणवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पाहिले.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कांतीलाल झगडे, अभिजित घोगरे, विजू बापू घोगरे, अमोल मुळे, अनिकेत निंबाळकर, अरुण घोगरे, सचिन काटकर, अशोक चव्हाण, छगन गायकवाड, राहूल बोरकर, राजू होनमाने, नागेश गायकवाड, सनी बंडगर, बाळासाहेब कोकाटे, मोहन काटे, सुरेश कोकाटे, नवनाथ कोकाटे, भागवत जाधव, सुहास घोगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा