उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज चॅनल
ना नफा,ना तोटा तत्वावरील उपक्रम.
कला,क्रीडा,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने ना नफा,ना तोटा या तत्त्वावर सर्वसामान्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा याकरिता उभारलेल्या रत्नाई मिठाई केंद्राचे उद्घाटन सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.
श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती शताब्दी निमित्त आणि जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित केला आहे.
उद्घाटन प्रसंगी सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग एकतपुरे,रामचंद्र गायकवाड, उत्कर्ष शेटे,प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले,सचिव बिभीषण जाधव,सर्व संचालक, सभासद उपस्थित होते
प्रस्ताविकात विजय उबाळे म्हणाले, मागील सुमारे ४६ वर्षापासून मंडळाने जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक भव्य उपक्रम आयोजित करून यशस्वी केले.समाजातील सर्वसामान्य गरजू लोकांना योग्य दरात दिवाळी चा सण साजरा करता यावा,या उद्देशाने दि.२५ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी १० ते ८ पर्यंत शंकरनगर येथे रत्नाई मिठाई विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.या उपक्रमास ग्राहकांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून गतवर्षी ६४४१ किलो विक्री झाली होती. यंदाही सुमारे ७५०० किलोपेक्षा अधिक विक्री होईल. या केंद्रात चिवडा, लाडू, बालुशाही, शंकरपाळी व शेव हे स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले पदार्थ उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. उपस्थितांचे स्वागत प्रताप तोरणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, राजकुमार पाटील यांनी तर आभार मल्हारी घुले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा