*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451
अकलुज राऊतनगर येथील श्रीराम दुर्गामाता नवरात्र महोत्सव मंडळ समिती यांच्या वतीने घटस्थापना दिवशी अकलूज शहरातून भव्य दिव्य अशी दुर्गामाता देवीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ दोरकर व विद्यमान अध्यक्ष युवराज दोरकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी गावांतून अत्यंत भक्तिभावाने व शांततेत मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला यावेळी नामांकित असा बैंजो पथक व शिवभक्त यक्षांचा कैलासावरील तांडव नृत्याचा जिवंत असा सुंदर देखावा सादर करून अकलूजमधील सर्व देवीभक्तांना व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हे मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या देखावा सादर करुन समाज प्रबोधनाचे कार्य करत असते व अकलूज गावाचे महोत्सव समिती चे पारितोषिक पटकावीत असते यावर्षी देखील मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला या मंडळात सर्व कार्यकर्ते गेली 31 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात या दुर्गामाता देवीचा अकलूज परिसरात नवसाला पावणारी दुर्गामातादेवी म्हणून लौकिक आसुन
आदराने व भक्तिभावाने लोक सकाळी व संध्याकाळी महाआरतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। अशी ही नवसाला पावणारी आई दुर्गामातेचा महिमा गेली 31 वर्षे शिवाभाऊ दोरकर व युवराज दोरकर समितीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते अखंडपणे पार पाडत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा