*यशवंतनगर--प्रतिनिधी*
*नाजिया मुल्ला*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे भोंडला कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .भोंडला कार्यक्रमासाठी सोनम सच्चिदानंद नारायणकर संचालिका नृत्यसंगम कला अकॅडमी ,जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे सभापती प्रशाला समिती ,अनिल जाधव सदस्य प्रशाला समिती उपस्थित होते.
आधुनिकतेचा आग्रह धरताना आपली परंपरा व संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोंडल्याचे आयोजन करण्यात आले.
प्रथम हत्तीच्या मूर्तीची पूजा मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली .सर्व महिला व विद्यार्थिनींनी हत्तीभोवती फेर धरून ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा यांसारखी पारंपारिक गाणी गायली.
शारदीय नवरात्रोत्सवातील भोंडला कार्यक्रमाचे महत्त्व आपल्या भाषणातून सहशिक्षिका भाग्यश्री उरवणे यांनी व्यक्त केले.
भोंडल्याच्या पारंपारिक गीतांबरोबर गरबा व दांडीया गीतावर ठेका धरत विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. खिराफत ओळखीनंतर सर्व विद्यार्थ्यांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा गायकवाड यांनी केले तर आभार प्रभावती लंगोटे यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा