*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर राज्यात विधानसभेचं वारे वाहू लागले आहेत. अशातच येणाऱ्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक विभागासाठी देशातील बड्या नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी एकीकडे निवडणूकीची तारीख होत असताना दुसरीकडे कॉंग्रेसने राज्यासाठी ११ निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत.
अलिकडेच पार पडलेल्या हरियाणा विधानसभेत कॉंग्रेसला मोठा फटका बसला. यातून धडा घेत कॉंग्रेसने महाराष्ट्रासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशाच आता दिल्लीतून प्रत्येक विभागासाठी निरीक्षक नेमण्यात आल्याचे समजत आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण विभागाची जबाबदारी राजस्थानचे माजी मुख्यमत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक गेहलोत आणि जी. परमेश्वरा यांच्याकडे सोपविली आहे. तर विदर्भाची जबाबदारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उमंग सिंघर यांना देण्यात आली.
मराठवाड्याची जबाबदारी राजस्थानचे कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टी.एस. सिंहदेव आणि एम.बी. पाटील तर उत्तर महाराष्टराची जबाबदारी सईद नासीर हुसेन आणि डी. अनुसया सीताक्का यांच्याकडे सोपविली आहे. तर वरिष्ठ निरीक्षक म्हणून मुकूल वासनिक आणि अविनाश पांडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा