*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुंबई :-- मराठमोळी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त काही युट्युब चॅनेल्समधून दाखवण्यात येत आहे. ते बघून अनेकांनी दु:ख आणि संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. परंतु नीना कुलकर्णी जिवंत असून त्यांनी निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सदर चॅनेलला खडेबोल सुनावले आहेत.
निधनाच्या व्हायरल बातम्या आणि अफवांना कंटाळून नीना कुलकर्णी यांनी यावर मौन सोडलं आहे. “युट्युबवर माझ्या निधनाची खोटी बातमी पसरवली जात आहे. मी जिवंत आहे आणि देवाच्या कृपेने उत्तम कामही करत आहे. कृपया अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका किंवा त्याला खतपाणी घालू नका. देवाच्या कृपेने मला उत्तम आयुष्य लाभो,” अशी पोस्ट नीना यांनी शेअर केली आहे. नीना यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागला. याआधीही अनेक कलाकारांच्या निधनाच्या अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत आणि त्याबद्दल कलाकारांनी संतापही व्यक्त केला आहे. मात्र तरीही असे प्रकार अद्यापही सोशल मीडियावर सुरु आहेत. दरम्यान, नीना कुलकर्णी सध्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा