*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
१५ आँक्टोबर रोजी "वाचन प्रेरणा दिना "निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व ज गं पेडणेकर माध्यमिक विद्यालय ,तडवळे यांच्या संयुक्त विद्यमाने "डाँ अब्दुल कलाम "यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला कोमसाप शाखा लांजाचे अध्यक्ष - रामचंद्र जाधवसर ,प्रशालेचे स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष - संजय पाटोळे
कोमसाप लांजाच्या उपाध्यक्षा डाँ माया तिरमारे,कोषाध्यक्ष - शहाजीराव देशमुख
सदस्य व साहित्यिक - प्रभाकर गवाणकर
मुख्याध्यापक - डी.बी पाटीलसर आदी उपस्थित होते.
प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांना चंद्रशेखर गायकवाड लिखित "यशाचा राजमार्ग आत्मविश्वास "साहित्यकृती भेट देण्यात आली.
अकलूज शहरात भक्ती टायपींग इन्स्टट्युट व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यत चंद्रशेखर गायकवाड यांच्या ५००० पुस्तकांचे मोफत वाटप विद्यार्थी आणि युवकांना करण्यात आले आहे
प्राचर्य -गजानन जवंजाळसर यांचे यात मोठे योगदान आहे.याशिवाय माळीनगर दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन. राजेंद्र( रंजनभाऊ) गिरमेसाहेब यांनी साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड यांच्या २००० पुस्तकांचे वाटप केलेले आहे.स्वामी विवेकानंद विद्यालय शिरसोडी मुख्याध्यापक जाडकरसर व शिक्षक
रियाज शेखसर यांनी
शिरसोडी गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना साहित्यकृती भेट दिलेली आहे.हनुमान विद्यालय तांदुळवाडी येथील शाळेत अंतर्गत मुल्यमापन यासाठी चंद्रशेखर गायकवाड यांचे "विचारपीठ"ही साहित्यकृती देण्यात आली होती.प्रा विठ्ठलराव साळुंखे यांचे
यामध्ये योगदान आहे.
लातुर जिल्ह्यातील अभियंता धुमाळसाहेबांनी हार फेटा सत्कारा ऐवजी
चंद्रशेखर गायकवाड लिखित"*स्वातंत्र्याचा पहिला उद्रेक रणझुंजार छत्रपती शिवाजी महाराज* *" या पुस्तकाच्या २००० प्रतिचे वाटप करण्यात आले होते.
अकलूजचे साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड यांची एकूण २३ पुस्तके प्रकाशित असून २०२५ मध्ये
"निर्णय एक शक्ती"
हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा