*अकलूज ----प्रतिनिधी*
*बाळासाहेब गायकवाड
कला, क्रीडा , सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने समाजातील गरजू लोकांना दिवाळीचा सण साजरा करता यावा यासाठी रत्नाई मिठाई या उपक्रमातून योग्य दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी आणि जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त यावर्षी सदरचा उपक्रम शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेमध्ये रत्नाई मिठाई वाटप केंद्र, मारुती मंदिर जवळ, शंकरनगर येथे सुरू राहणार आहे
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला होता. यानंतर कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर रत्नाई मिठाई या नावाने हा उपक्रम सुरू झाला.
सदरच्या केंद्रात स्वच्छ व उच्च दर्जाच्या पदार्थापासून मिठाई तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये चिवडा, लाडू, बालुशाही व शंकरपाळी प्रति किलो 275/- रुपये याप्रमाणे उपलब्ध होणार आहे.
यासाठी नामदेव कुंभार 9511808004, जयवंतराव माने देशमुख 7720067824, शिवाजी पारसे 8329 590065, बाळासाहेब सावंत 9960195839
यांच्याकडे सदरचे पदार्था साठी नोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे. सदरचा सामाजिक उपक्रम ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू असल्याचे सचिव बिभीषण जाधव यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा