*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर पुणे व सोलापूर जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला असल्याचे दिसून आले आहे.पक्षाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रकारच्या प्रश्नावर आवाज उठवून ते सोडविले असल्याचे सर्वसृत आहे.पक्षाच्या शाखा बांधणी,कार्यकर्ते जोडणे मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली आहे.
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस,माढा, सांगोला या मतदारसंघात निवडणूक लढविली जाऊ शकते याची चाचपणी पक्षांतर्गत सुरू असून लवकरच पक्षप्रमुख किरण साठे या बाबतीत भूमिका जाहीर करतील
परिवर्तन महाशक्ती आघाडीचे प्रमुख नेते असलेले माजी खासदार राजू शेट्टी आणि पक्षप्रमुख किरण साठे यांची भेट झाली होती,त्यानंतर महाराष्ट्र विकास सेना पक्ष परिवर्तन महाशक्ती आघाडी बरोबर जाणार आशा चर्चा सुरू झाल्या होत्या.मात्र त्याचे पुढे काय झाले ? याची कल्पना कुणालाच नाही,पक्षप्रमुख किरण साठे हे परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या प्रमुख नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे,तिसऱ्या आघाडीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष गेल्यास कोणत्या जागेवर दावा करणार,पक्षांतर्गत सांगोला,माढा,माळशिरस या तीन जागेवर त्याची चाचपणी सुरू आहे.त्यामुळे परिवर्तन महाशक्ती आघाडीत महाराष्ट्र विकास सेना पक्ष सामील होणार का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे,सामील झाल्यास पक्षप्रमुख किरण साठे माळशिरस विधानसभा निवडणुकीत उतरतील अशी शक्यता असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,माढा मतदारसंघावर दावा करू शकतात.याच गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या भूमिकेकडे जाणकारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा