*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जयकिसान जंक्शन कृषी केन्द्र लवंगचे मॅनेजर संकेत पिसाळ योगेश रेडे पाटील व निलेश वाघ उपस्थित होते.
संकेत पिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,शालेय शिक्षणात वाचनाचे महत्व,तसेच भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्रातील वैज्ञानिक उपकरणांमुळे होणारे फायदे आणि महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी द ग्रेट मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आढावा घेताना भारत देश हा जगात महासत्ता राष्ट्र बनणार असल्याचे भाकीत त्यांनी केले होते.प्रत्येक विद्यार्थ्यांनी रोज किमान दोन तास तरी वाचन केलेच पाहिजे,पुस्तक हेच मानवाचे खरे मित्र असतात त्यामुळे या पुस्तक मित्रांसोबत आपण रोज थोडा वेळ घालवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. पालक संघाचे अध्यक्ष निलेश वाघ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा