*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-,9096837481*
नांदेड या ठिकाणी झालेल्या विभागीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल 14 वर्ष मुलींच्या संघाचा दिनांक 15/10/2024 रोजी शाळेच्या वतीने खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी काक्रंबा बीटचे विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे, केंद्रप्रमुख लोखंडे एस.एस, धाराशिव पं.समितीचे मा. सदस्य गजेंद्र जाधव, जि. शि.सह.सोसायटी धाराशिवचे संचालक बाळासाहेब घेवारे, बारूळ गावचे सरपंच शहाजी अण्णा सुपनार, शाळेचे मुख्याध्यापक शेख एस.एम, सुरेश ठोंबरे मा.मुख्याध्यापक जवाहर विद्यालय अणदूर ,रामकृष्ण खडके मुख्याध्यापक जि.प प्रा.शा खंडाळा, संजय ठोंबरे,रतन मुदगुडे, समाजसेवक नबीलाल चाचा शेख ,गणपती कुंभार,बाळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अणदूरकर सर,नाईक सर,शा. व्य.स. अध्यक्ष मन्मथ ठोंबरे व खेळाडूचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी पवार सर यांनी केले.नांदेड या ठिकाणी झालेल्या विभागीय स्पर्धेत खेळाडूने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.राज्यस्तरीय स्पर्धेत हा संघ लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विजय खेळाडूंचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांपैकी विजय खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना गजेंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खेळाडूने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले तसेच सध्याच्या या युगात मुले मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवतात याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतात यामुळे मुलांनी शालेय खेळाकडे लक्ष दिल्यास व नियमित अभ्यास केल्यास खेळाडूंची भविष्य उज्वल होऊ शकते पण यासाठी खेळाडूंनी खेळाच्या सरावांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. बारूळ सारख्या एका छोट्याशा गावातील खेळाडूंनी ही केलेली कामगिरी खरंच कौतुक करण्यासारखी आहे व नक्कीच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा खेळाडू विजय पताका लावतील व लातूर विभागाचे नावलौकिक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्हा सोसायटीचे संचालक बाळासाहेब घेवारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना शाळेने केलेल्या क्रीडा क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात केलेली प्रगती ही खरीच गावासाठी व आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या विजय खेळाडूंना जवाहर विद्यालय अणदूरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे सर यांच्यातर्फे खेळाडूंना किट भेट देणार आहेत.ही शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. या विजय खेळाडूंना मार्गदर्शन बालाजी पवार सर, बळीराम कांबळे, योगेश ताटे, किरण जाधव , ओम मुळे, अण्णा पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, तुळजापूर पं.स.गटशिक्षणाधिकारी इनामदार मॅडम यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिन मुलाणी तर आभार प्रदर्शन मोरे एन .एस यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील वैभव सगर ,गडेकर आर.सी, चव्हाण के . एच, जाधव एस.के, राजगुरू एम.आर, वाघमारे एस .व्ही यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा