*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
शेतकरी,कामगार,कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर झगडणारी एक सामाजिक संघटना असावी या भावनेतून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते (स्व.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी जनसेवा संघटनेची स्थापना केली आता या संघटनेला वटवृक्षाचे स्वरूप आले आहे.जनसेवेचे सभासद असणारे अनेक जण आमदार, खासदार झाले मात्र मधल्या काळात संघटनेला मरगळ आली होती.ती आता झटकून पुन्हा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल अस विश्वास डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अकलूजमध्ये प्रतापगड या निवासस्थानी जनसेवा संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या वेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, आक्का साहेब व लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.या वेळी प्रथम पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात जीव गमावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करून चोख प्रत्युत्तर दिले याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अभिनंदनाचा ठराव अण्णासाहेब शिंदे यांनी मांडला.त्यास प्रताप झंजे यांनी अनुमोदन दिले. या वेळी भीमराव बाळगी,शाहीर राजेंद्र कांबळे,अशोक पाटोळे, किशोर जाधव,संग्राम जाधव, विष्णू शिंदे,केशव लोखंडे,विराज खराडे,अभिषेक कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पद्मजादेवी मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील, सतीश पालकर,मारुती खटावकर,आण्णासाहेब इनामदार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलत्या राजकीय परिस्थिती बरोबर योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल डॉ.धवलसिंह म्हणाले,बदलत्या राजकीय परिस्थितीबरोबर कुठेतरी आपल्यालाही बदलावे लागणार आहे.मधल्या काळात कोणत्या पक्षाने काय केले याच्या खोलात मी जाणार नाही.योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल. जनशक्तीच्या माध्यमातून जोपर्यंत आपण आपल्या भागात जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहत नाही तोपर्यंत राजकारण हा विचार थोडा बाजूला ठेवून आपल्याला काम करावे लागेल.
कुठलीही सत्ता नसताना केवळ एका फोनवर एवढी मोठी उपस्थिती म्हणजेच आजही जिल्ह्यातील लोकांचा जनसेवेवर तितकाच विश्वास आहे.या संघटनेच्या माध्यमातून आपण परत एकदा जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे लढू असा शब्द त्यांनी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा