*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-,9096837481
माळीनगर ता माळशिरस येथील
या ठिकाणी पालखी मार्गावर कट पॉईट केले नसून त्यासाठी श्रीहरी नगर माळीनगर व नंदनगर येथील सर्व ग्रामस्थ लक्षणीय साखळी उपोषण सोमवार दिनांक 7ऑक्टोबर 2024 रोजी करणार असल्याचे निवेदन अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंभोरे साहेब यांना दिले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
माळीनगर मधून गेलेल्या पालखी महामार्ग वरील श्रीहरीनगर येथील पीडितः ग्रामस्थ आहोत. आपणास ह्या निवेदनाद्वारे आम्ही सांगू इच्छितो की माळीनगर मधून पालखी महामार्ग गेला असल्याने माळीनगर गावाचे दोन भाग झाले आहेत, याचा फटका सगळ्यात जास्त प्रमाणातः श्रीहरीनगर येथील राहत असलेल्या नागंरिकाना मोठ्या प्रमाणात झाला आहे. पालखी महामार्गा वरती माळीनगर हददीत कोठेही कट पॉईट ठेवलेला नाही. याचा परिणाम पालखी महामार्गच्या दोन्ही बाजूस असलेली उदा. प्राथमिक आरोग्यकेंद्र, स्मशानभूमी, दफनभूमी, ग्रामीणमार्ग, शालेय विदयार्थी याच्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. येथील प्रत्येक नागरिक त्या गैर सोयीमुळे त्रस्त झाला आहे. म्हणून ह्या सर्व बाबीचा विचार करून माळीनगर ग्रामपंचायतीने 22/12/23 रोजी बहुमताने श्रीहरीनगर येथे कट पॉईट करावा याचा ठराव केला तसेच वरील ठरवाची प्रत व निवेदन मा. प्रकल्प अधिकारी सो, सत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पंढरपूर कार्यालय गांना दि 17/01/2024 रोजी समक्ष भेटून दिली, त्याचा सातत्याने पाठपुरावा केला व त्यांनी तक्रारीची दखल घेवू असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत वरील कार्यालया कडून कसल्याही प्रकारचे समाधान झाले नाही. म्हणून वरील ठिकाणच्या नागरिकाच्या सह्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी अकलूज ह
यांना देण्यातआले व ग्रामस्थाच्या वतीने तकारीची दखल घेण्याची विनंती केली परंतु अद्याप पर्यंत येथील नागरिकांच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्याचाच परिणाम सर्व ग्रामस्थांमधे संतापाची लाट निर्माण होऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून ह्या विषयाला लोकशाही मार्गाने आदोलनाचे स्वरूप देण्यासाठी दि 07/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता श्रीहरी नगर कमानी समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला असून जोपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही कट रस्ता करत नाहीतोपर्यंत माळीनगर येथील श्रीहरीनगर येथे लाक्षणिक (साखळी उपोषण करण्यात येईल तरी
आम्हास आमच्या लोकशाही मार्गाने आदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे
माळीनगर (श्रीहरीनगर व नदननगर) येथील सर्व ग्रामस्थ यांच्या स्वाक्षरीसह




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा