Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

*नितीन चौगुले यांचे अन्याय वअत्याचार ग्रस्त मुलींना न्याय देण्याचे कार्य अभिनंदन---*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला *(पत्रकार)* 

*सांगली*

*मो;--89830587160

कॅफेमध्ये तरुणींचे होणारे लैंगिक. शोषण, विशिष्ठ कॅफेमधील "सिंगल बेड तसेच कंपार्टमेंट काढण्यासाठी शासनस्तरावर असणारा "निरुत्साह" आणि मुली - तरुणी सुरक्षित राहण्यासाठी "शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे" अध्यक्ष श्री. नितीन चौगुले. यांनी उभारलेला "लढा" यावर प्रकाशझोत टाकणारा, आणि पालकांच्या - तरुणींच्या डोळ्यात "अंजन" घालणारा हा लेख !


  *कॅफेचा विळखा तरुणींच्या आयुष्याची "राखरांगोळी" करणारा ठरतोय!* 


सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात कॅफेमध्ये तरुणींचे लैंगिक शोषण करून,त्यांचे फोटो - व्हिडिओ काढून, त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांचे "शोषण" करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अब्रू चे "खोबरे" नको म्हणून ती तरुणी नाईलाजास्तव सर्व सहन करत असते.

कित्येक वेळा तरुणींच्या आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रात आलेल्या असतात. कदाचित अशाच प्रकारातून आणि वैफल्यग्रस्तेने या आत्महत्या होत नसाव्यात ना?? विस्तारित सांगली -मिरज व अथवा एकांतात असणाऱ्या "कॅफेमध्ये" "स्कार्फ" बांधून किंवा तोंड उघडे ठेवून आलेल्या मुली या भांबावलेल्या अवस्थेत असतात. बहुदा त्यांना जबरदस्तीने अथवा ब्लॅकमेलिंग करूनच तो तरुण त्यांना आणलेला असतो . 

सुंदर तरुणी आणि अक्षरशः भामटे असणारे तरुण त्यांच्यासोबत आलेल्या असतात.कदाचित सोबत काढलेला फोटो सोशल मीडिया मध्ये व्हायरल करण्याच्या धमकीमुळेच त्या आलेल्या असाव्यात.

असे प्रकार होऊ नयेत म्हणून, तरुणींनी तरुणांना सर्वप्रथम नकार" द्यायला शिकले पाहिजे. कारण तरुणासोबतचा फक्त एक "फोटो" तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करण्यासाठी "कारणीभूत" ठरू शकतो.


 *नितीन चौगुले यांचे अभिनंदनीय कार्य !*


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष ,माझे मित्र - हितचिंतक श्री.नितीन चौगुले यांनी प्रारंभापासूनचं "बंदिस्त कॅफेला विरोध केला आहे. मंत्रालयात आमदारांना. सोबत घेत "शासनाला" जाब विचारत पोलिसांच्या "निष्क्रिय" कार्यपद्धतींबद्दल त्यांनी "तक्रार" दिली . 

तरुणींच्या संवेदनशीलता आणि त्यांच्यावर होणारे बलात्कार - विनयभंग , ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणाविरुद्ध त्यांनी "आवाज" उठवला आहे. बंदिस्त कंपार्टमेंट नसावेत म्हणून त्यांनी मोठे आंदोलन उभारून "कॅफेचा विळखा" कायमचा "बंद" होण्यासाठी आश्वासक पाऊल उचलत आपला हिसका दाखवला आहे. केवळ श्री. नितीन चौगुले यांच्यामुळेच आज कॅफे मध्ये चालणारे घृणास्पद आणि 'लाजिरवाणे' प्रकार "बंद" झाले आहेत.

काही विशिष्ठ कॅफे मध्ये सिंगल बेड असणे हें कशाचे" द्योतक" आहे?? विना कंपार्टमेंट आणि "पांढऱ्या काचेच्या" माध्यमातून "पारदर्शी" व्यवसाय करता येतो हे नितीन चौगुले यांनी "सिद्ध" करून दाखवले आहे. 

श्री.चौगुले यांचा "सरसकट" कॅफे ला "विरोध" नसून काळी काच , "बंदिस्त" कंपार्टमेंट आणि बेडसदृश्य व्यवस्थेला विरोध आहे. श्री नितीन चौगुले यांनी जनतेच्या हितासाठी "आदर्श" संवेदनशील विचार प्रत्यक्षात आणून ,आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे "वारसदार" आणि "सोबती" असल्याचे "सिद्ध" केले आहे.


 *पालकांनी तरुणींवर "आदर्श संस्कार" द्यावेत !*


आपल्या मुलीला "आदर्शवत संस्कार" देणे ही "पालकांची" जबाबदारी आहे. मुलीचा "पाय" घसरेल. म्हणून काही टिप्स तिची आई देखील एका मैत्रिणीप्रमाणे देऊ शकते.

भविष्यात कॅफेत बलात्कार होईल ही बातमी कित्येक महिने आधी मी दिली होती. ती खरोखर "सत्यतेत" उतरली. काही दिवसापूर्वी एका तरुणीने "धाडस" करत एका तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. श्री.नितीन चौगुले यांनीच पुढाकार घेत पोलिसात गुन्हा नोंद करावयास लावला व त्या अल्पवयीन - अल्पसंख्यांक मुलीला "न्याय" दिला.

"अन्याय" अथवा अत्याचार झाल्यास तरुणींनी अजिबात न घाबरता ,"पोलिसात" तक्रार द्यावी. वृत्तपत्रात तुमचे "नाव" येत नाही याची तरुणींनी "नोंद "घ्यावी. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून सर्व तरुणींनी "सावध" राहावे ही विनंती !



 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा