*वाशी---प्रतिनिधी*
*बळीराम जगताप*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील वनस्पतीशास्र विभाग व ग्रीन क्लब महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि १- आक्टोंबर २0२४ रोजी सकाळी ११:३० वाजता जलप्रदूषण रोखण्यासाठी वाशी गावाजवळ असलेल्या पवार यांच्या शेतात असलेले तळे गणपती विर्सजनामुळे व कपडे धुण्यामुळे तेथील पाणी प्रदूषित झाले होते. तळ्याच्या काठावर अनेक प्लास्टिक पिशव्या, बॉटल, गणपतीचे हार , फाटलेले कपडे इत्यादी साहित्य आढळून आले त्यामुळे पाणी प्रदूषीत होत होते . याची दखल घेवून प्राचार्य डॉ अरुण गंभीरे यांच्या मार्गदर्शना खाली महाविद्यालयातील विद्यार्थीनी व विद्यार्थी तळ्यावर नेहून जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती वनस्पतीशास्र विभाग प्रमुख प्रा शाम डोके यांनी केले . तसेच ग्रीन क्लब प्रमुख डॉ क्षिरसागर सर यांनी प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आवाहन केले व त्याचे दुष्परिणाम सांगितले तर डॉ कांबळे सर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा