*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
"शंकरनगर-अकलूज येथील महर्षी शकंरराव मोहिते-पाटील प्रशालेच्या 23 वर्षापुर्वीच्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या पदावर मजल मारुन नावलौकीक मिळविला हि बाब अभिमानास्पद आहे .असे मत महर्षी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी काढले.
महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेल्या इयत्ता 11वी 12 वी च्या सन 2000-2001 मधील 23 वर्षांनी माजी विद्यार्ती स्नेह मेळावा महर्षी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संंपन्न झाला. याप्रसंगी गळीतकर बोलत होते पुढे ते म्हणाले कि" सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील यांनी शिक्षणाची विकासगंगा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणली.त्यामुळेच आज या भागाचा विकास परीपुर्ण झालेला आहे. दर्जेदार शिक्षणामुळेच हि पीढी सुस्कृत निघाली.समाजात सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशाप्रकारे मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी माजी शिक्षक एस.एम.शिंदे , बशीर मुलाणी , बाळासाहेब काटकर सर व सर्व माजी विद्यार्थि व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यांवेळी सर्व गुरुजणांचा सत्कार करुन आभार व्यक्त करणेत आले.
तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे मार्गदर्शन करुन आनंदउत्सव साजरा केला..शेवटी संर्वाचे आभार मोहम्मदशा मकानदार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा