*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याचा छंद जोपासला आहेत.
माळशिरस तालुक्यात गिरझणी (ता.माळशिरस) येथील लहान मुला-मुलींनी छत्रपतींच्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारून शिवाजी महाराज यांच्या इतिहास जतन करण्याचे काम करीत आहेत.दरवर्षी शाळेला दिवाळी सुट्टी मिळाली की वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आहेत.
गिरझणी येथील कु.साक्षी लावंड,कु.पल्लवी लावंड,महेश लावंड व गणेश लावंड हे चौघे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना जरी गड किल्ले येथे जरी पहाण्यासाठी जाता येत नसले तरी या मुलांनी तयार केले किल्ले बघून समाधानी होतात.यापुर्वी ही त्यांनी शिवनेरी किल्ला,रायगड किल्ला,सिंहगड किल्ला, कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ल्यांच्या प्रतिकृती यापुर्वी बनविल्या आहेत.विशेष म्हणजे ही मुले किल्ल्यांची छायाचित्र बघून हुबेहूब किल्ल्याच्या प्रतिकृती बनवित असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना छत्रपतींच्या किल्ल्याची माहिती मिळते व शिवाजी महाराजांच्या कार्याच्या इतिहासाचे ज्ञान मिळत आहे.या किल्ला पहाण्यासाठी दररोज लोकांची गर्दी होत आह. पत्रकार कृष्णा लावंड यांची मुले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा