*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम येथे शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजले पासून 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी संपेपर्यंत इंदापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठीबंद राहील यासाठी आदेश पारित केला आहे
मतमोजणीसाठी एकूण 24 टेबलाची व्यवस्था केली आहे
ईव्हीएम मतमोजणी साठी 14 टेबल,
टपाली मतदान मतमोजणी 8 टेबल,
सैनिक मतदार मतमोजणी साठी 2 टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे
या मतमोजणीसाठी एकूण 210 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
मतमोजणीसाठी इतर तालुक्यातून कर्मचारी येणार असून सकाळी 6 वाजता त्यांची हजेरी होईल.
प्रत्येक टेबलला 1सुपरवायझर 1 असिस्टंट व 1 सूक्ष्म निरीक्षक असेल दि.23 नोव्हेंबर रोजी
सकाळी ठीक 8 वाजता टपाली मतदानाला प्रारंभ होईल 8/30 वाजता ईव्हीएम मतमोजणीला प्रारंभ होईल, ईव्हीएम च्या एकूण 25 फेऱ्या होणार आहेत
फेरी निहाय निकाल जयसिंह चौकात स्पीकर राहील तिथे पर्यंत ऐकू येणार आहे.
मतमोजणीसाठी स्वतंत्र निरीक्षक दाखल झाले आहेत
मतमोजणीसाठी मीडिया कक्ष स्वतंत्र ठेवला आहे,
उमेदवार /प्रतिनिधी /कर्मचारी यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
ओळखपत्रा शिवाय प्रवेश दिला जाणार नाही
मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास मनाई आहे
मतपेट्या व उमेदवार /प्रतिनिधी आज पहाटेदि 20 नोव्हेंबर रोजी 12/55 वाजता निरीक्षक यांच्या उपस्थितीत सुरक्षा कक्षात ठेवून सुरक्षा कक्ष सीलबंद करण्यात आला आहे
सुरक्षा कक्ष I T P F च्या ताब्यात देण्यात आला आहे सुरक्षा कक्षाला त्रिस्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे
सुरक्षा कक्षाची पाहणी CCTV चे प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उमेदवाराला निवडणूक कार्यालयाचे गोदामात नियंत्रक कक्षात करण्यात आली आहे
मतमोजणी कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण 2 सत्रात झाले असून उद्या पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अशी माहिती 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा