Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

जयराज सहकारी पतसंस्थेला 26 लाखाचा नफा- सभासदांना 11 टक्के लाभांश तर कर्मचाऱ्यांना 25 टक्के बोनस*


 

*विशेष--- प्रतिनिधी*

   *एहसान----मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  ,*मो:-9096837451*

माळशिरस  तालुक्यातील  आनंदनगर - अकलूज  येथील जयराज  सहकारी पतंस्थेला अहवाल सालात 26 - 25 लाख ऐवढा निव्वळ  नफा मिळालेला असुन सभासदांना 11 टक्के  लाभांश तर कर्मचाऱ्यांना 25 टक्के  लाभांश   संस्थेचे विद्यमान चेअरमन शशिकांतराव नारायणराव माने-पाटील  यांचे  प्रमुख  शुभहस्ते दिवाळी सणा पूर्वी  वाटप करणेत आल्याने सभासदांमध्ये आंनदाचे वातावरण  निर्माण झाले आहे.                              जयराज सहकारी पतसंस्थेची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह  मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चेअरमन  शशिकांतराव माने-पाटील यांनी आनंदनगर , अकलूज ,बागेचीवाडी,चाकोरे,गिरझणी,कोंडबावी,वटफळी, संग्रामनगर , यशवंतनगर  परीसरातील जनतेच्या उन्नतीसाठी स्थापन केली. दरवर्षी  गरजु, छोटे छोटे उद्योगधंदा करणारे, शेतकरी बांधवांना शेती अवजारे, घरबांधणे,  मुलांच्या  लग्नासाठी वेळोवेळी  लाखो रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येते असल्याचे संस्थेचे सचिव विजयकुमार भोसले यांनी सांगून  संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगीतला. संस्थेचे भागभांडवल 80 लाख ऐवढे असुन संस्थेत सुमारे.1200. सभासद आहेत.दरवर्षी आडीटवर्ग अ असुन अहवाल सालात सुमारे 26 लाख 25 हजारनफा झालेला आहे .11टक्के प्रमाणे  सभासदांना लाभांश वाटप करणेत आलेलेआहेत.तसेच चेअरमन शशिकांतराव  माने-पाटील  ,व्हाईस चेअरमन जनार्धन चव्हाण व संचालक  युवानेते जयराज माने-पाटील , सौरभ भैय्या इंगळे,  बाळासाहेब  शिंदे ,विलास शिवरकर,गोविंद तोरणे,बापुराव कदम,रामचंद्र काटकर, अशोक शेळमकर यांच्या कार्यकुशलमुळे कर्मचाऱ्यांना देखील25 टक्के बोनस हि वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे  मॕनेजर भोसले यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा