*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उत्तमराव जानकर यांना तालुक्यातून एक लाख एक हजाराचे लीड देणार असल्याचे ठरलेले आहे असे मत सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.माळशिरस विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवरत्न बंगला येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत तसेच सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार आर.जी.रुपनवर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील,चि. विश्वतेज मोहिते-पाटील,चि. सयाजीराजे मोहिते-पाटील, रामचंद्र सावंत,प्रकाशराव पाटील,संग्रामसिंह जहागीरदार, शिवसेना नेते नामदेव बाघमारे, युवा सेनेचे स्वप्निल वाघमारे, विकास धाईंजे,प्रा.धनाजी साठे. सुनंदा फुले आदी मान्यवरांसह तालुक्यातील गावगावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते उपस्थित यांच्या शुभहस्ते सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी केले तर शेवटी आभार दत्तात्रय भिलारे यांनी मानले.
*चौकट*
आ.सातपुते यांच्याकडून संपवण्याची भाषा,खा.धैर्यशील मोहिते पाटील मागील दोन वर्षापूर्वी आमदार सातपुते यांनी पुणे येथे मोहिते पाटील घराण्याला संपवण्याची भाषा केली होती.त्यामुळे अशा माणसाला त्याची किंमत दाखवण्याची वेळ आली आहे. माळशिरस तालुक्याने एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. हे ऐतिहासिक पर्व आहे. तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी.त्यामुळे सर्वांनी उत्तमराव जानकर यांना प्रचंड मताधिकाने निवडून द्यावे असे मत यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले
*जबाबदारी वाढली*
महाविकास आघाडीचे उमेदवार जानकर म्हणाले की,आत्ता ख-या अर्थाने जबाबदारी वाढली आहे सर्व गट एकत्रित झाल्यामुळे तालुक्याला पुढे घेऊन जायचे आहे.पाठीमागील काळात काही चुका झाल्या असतील पण नव्याने राजकारण सुरू करत असताना एक मोठी जबाबदारी आली आहे असे यावेळी बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा