*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
गुरूने दिलेलं ज्ञान हे निस्वार्थ असतं.त्याचं मोल कोणत्याही गोष्टीत होऊ शकत नाही. शिक्षणा वाचुन जन्म वाया जातो. संस्कारी,मन आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी गुरूच गरजेचा असल्याचे मत जि.प. कोल्हापूरचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या उमंग माजी विद्यार्थी महास्नेह मेळाव्यामध्ये ते विद्यार्थ्यांना उपदेश करत होते. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.
इंद्रजित देशमुख पुढे म्हणाले की,हनुमान विद्यालयाने सन १९८७ ते सन २०१७ पर्यंतच्या आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना साद घातली आणी हे सर्व जुने विद्यार्थी आपल्या गुरूजनांच्या हाकेला प्रतिसाद देत इथे जमले आहेत.वय वाढत जातं.पुर्वी जे विद्यार्थी दशेत होते ते आज आपापल्या संसारात आणी उद्योग व्यावसायात रमले आहेत.संसारात रमण्यासाठी आणी उद्योग व्यावसायात यशस्वी होण्यासाठी तुमच्या गुरूंनी दिलेले संस्कार आणि दिलेले व्यावहारीक शिक्षणच तुमच्या आयुष्यात उपयोगी पडले हे कदापी विसरू नका.
या स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक साळुंखे सर यांनी केले.ते म्हणाले,प्रशालेचे संस्थापक वै.ह.भ.प. सुखदेवआप्पा शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत या प्रशालेची स्थापना केली.या ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात साक्षरतेचे नवचैतन्य फुलवण्याचे काम या शाळेने अविरतपणे केले आहे.आज जे माजी विद्यार्थी येथे जमले आहेत.त्यांचे त्यांच्या आयुष्यातील अनुभव,यश, अपयश आजच्या नवीन विद्यार्थ्यांना मोलाचे ठरेल.या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी डॉक्टर,वकिल,इंजिनिअर,
सरकारी सेवेत,सैन्य दलात आहेत.यांच्याकडे पाहून आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याच चांगल्या हेतुने या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे साळुंखे सर यांनी सांगितले. सदरचा कार्यक्रम शिक्षकांनी स्वखर्चाने केला. यावेळी सुमारे 900 माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी एकत्र आले होते.
*चौकट*
जर शिकलोच नसतो तर आयुष्यात पुढे काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही. आमच्या हनुमान विद्यालयातील शिक्षकांनी अगदी निस्वार्थ भावनेने आम्हाला ज्ञानदान केले आहे. त्यांच्या उपकारांची परतफेड आम्ही कदापी करू शकत नाही. आम्हाला कायम शाळेच्या ऋणात रहायला आवडेल.ज्या शाळेने आम्हाला घडविले व आयुष्यात यशस्वी केले त्या शाळेला भविष्यात आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत.
- माजी विद्यार्थी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा