उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे,शाखा - बार्शी तर्फे दिल्या जाणाऱ्या शाहीर अमर शेख राज्यस्तरीय पुरस्कार - २०२४ ची घाेषणा आज करण्यात आली.म.सा.प.बार्शी शाखेचे अध्यक्ष श्री.पां.ग.निपाणीकर,उपाध्यक्ष प्रा.श्रीमती प्रमिला देशमुख, कार्याध्यश्र प्रा.रविराज फुरडे,काेषाध्यक्ष श्री.बी.आर.देशमुख,प्रमुख कार्यवाह श्री.प्रकाश गव्हाणे,सह कार्यवाह श्री.प्रकाश महामुनी,कार्यकारी सदस्य श्री.जुगलकिशाेर तिवारी,सुधाकर कांबळे,श्रीमती शारदा पानगावकर,दिलीप कल्याणी,हरीभाऊ काेळेकर,आबासाहेब घावटे,साै.शिल्पा मठपती,प्रदीप गव्हाणे, गिरीश साेनार,स्वीकृत सदस्य प्रदीपकुमार कांदे,कु.मयुरी बाबर यांच्या उपस्थितीत सर्वानुमते कवी इंद्रजीत पाटील लिखित ' कळ पाेटी आली आेठी ' या परिपूर्ण अष्टाक्षरी काव्यसंग्रहाची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.तसे आैपचारिकरित्या पत्राद्वारे कळविण्यात आले असून सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.विश्वास पाटील,अध्यक्ष मा.आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते २ डिसेंबर २०२४,वार-साेमवार राेजी संत तुकाराम हाॅल,श्री.शिवाजी महाविद्यालय,बार्शी या ठिकाणी त्यांना सन्मानपूर्वक सपूर्द करण्यात येणार आहे.
साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना हा एकविसावा राज्यस्तरीय पुरस्कार असून या
कवितासंग्रहास हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.या आधी स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार आसू,ता.फलटण,जि.सातारा हा ही या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे.
साहित्यिक इंद्रजीत पाटील हे ग्रामीण भागातील एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व असून यावर्षी शेलक्या बारा हा कथासंग्रह व कळ पाेटी आली आेठी ही त्यांची दाेन्हीही पुस्तके अनेक राज्यस्तरीय पुरस्कारास पात्र ठरत अाहेत.
साहित्य क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असलेल्या या साहित्यिकाचे सर्व महाराष्ट्रभर विशेष काैतुक हाेत असून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा