उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
२५४ माळशिरस विधानसभा (आ.ज.) मतदार संघात माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव येथे आज शांततेत मतदान पार पडले. सकाळपासून महिला व पुरुषांनी मतदान केंद्रावर आपला हक्क बजाविण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
गणेशगांव जिल्हा परिषद शाळेमध्ये आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली.या गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान केले. सर्व ग्रामस्थ राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले होते.या गावची लोकसंख्या १०६४ असून त्यापैकी ७८७ स्री व पुरूषांनी मतदान करून ७३.९६ % मतदान झाले आहे.गावक-यांनी शांततेत मतदान केले असून या मतदार केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.गणेशगांव हे राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सतत अग्रेसर असते.मतदान शांततेत पार पडाण्यासाठी सरपंच सदाशिव शेंडगे,ग्रामसेविका लता घुले,पोलीस पाटील भाईसाब शेख, रामचन्द्र ठोंबरे,विठ्ठल नलवडे, कुंडलिक शेंडगे,नशीर शेख, माऊली मदने,गणेश यादव, हुमायून शेख ,गुलाब शेख ,यशवंत सोलनकर श्रीमंत शेंडगे ,सागर मोरे, अमीर कोरबू , यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा