*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----- इंदापूर विधानसभा निवडणुकीत ३ लाख ४१ हजार ४८५ मतदारापैकी २ लाख ५९ हजार ८७१ असे ७६.१० टक्के मतदान संपन्न झाले. सन २०१९ च्या तुलनेत ०.२४ टक्के मतदान कमी झालेले आहे. त्यामुळे कोण कोणाला धक्का देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गणेशवाडी येथे जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जेष्ठ नागरिकांना हाताला धरून आणून मतदान घडवण्यात आले. तर दिव्यांगाना टू व्हीलर व फोर व्हीलर मधून आणून मतदान घडवण्यात आले. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
त्याचप्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील मतदान केंद्रावर पोलींग एजंट म्हणून प्रथमच महिलांनी सहभाग घेतला.
त्यामध्ये माजी सरपंच ज्योती बोडके, माजी उपसरपंच अनुराधा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुनिता शेंडगे, तायडा सुतार यासह महिलांनी सहभागी होत निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. प्रथमच महिला पोलींग एजंट म्हणून बसल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट - गणेशवाडी येथे एकूण ११२६ पैकी १००६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ८९.०६ टक्के मतदान झाले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा