*प्रा. विश्वनाथ पाटील-- कोडोली*
*जि. कोल्हापूर
कोडोली ( ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ) " शिक्षकांना वर्गअध्यापनात चेतक बदल करण्यासाठी शैक्षणिक साधने वापरण्याची आवश्यकता असते. शैक्षणिक साधनांच्या प्रभावी वापरासाठी त्यांच्या निर्मितीचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळेचा शिक्षकांना जीवनात उत्तम उपयोग होईल," असे मत प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित चार दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे ललित कला विभागप्रमुख प्रा. प्रदीप पाटील यांनी चार दिवसीय कार्यशाळेचे संयोजन करताना प्रत्यक्ष शैक्षणिक साधने तयार करून दाखविली. विद्यार्थी - शिक्षक निर्मित शैक्षणिक साधनांचे महाविद्यालयात प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे सांगत प्रा. प्रदीप पाटील यांनी गुणवत्ताप्राप्त शैक्षणिक साधननिर्मात्यांना प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विद्यार्थी - शिक्षक पृथ्वीराज केकरे यांनी स्वागत केले. विद्यार्थी प्रतिनिधी साई नलगे यांच्यासह इतर विद्यार्थी - शिक्षकांनी कार्यशाळेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मोनिका पाटील यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा