*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
-----महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व ऐतिहासिक यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राप्त करून दिले. त्यामुळे महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत. त्यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेऊन अभिषेक घालून महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध व्हावा असे साकडे घातल्याचे माजी खासदार अमर साबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्याने दर्शन घेवून अभिषेक घातला यावेळी माजी खासदार अमर साबळे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी साबळे यांनी ईव्हीएम बाबत भाष्य केले, ईव्हीएम विषयी जी चर्चा होत आहे, ती जनतेचा सुर नाही. चारीमुंड्या चित झालेले विरोधक स्वतःची अब्रू झाकण्यासाठी ईव्हीएम संदर्भात आरोप करत आहेत. झारखंड मध्ये त्यांचे सरकार आले तेव्हा ते ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असे म्हटले नाहीत. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थोडसं जास्त यश प्राप्त झाले, त्यावेळी ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असे ते म्हटले नाहीत. परंतू,जेव्हा-जेव्हा विरोधकांचं तोंड कलंकित होतं ते झाकण्यासाठी ईव्हीएम वर आरोप करायचा ही त्यांची पद्धत आहे. जनतेने निर्विवाद बहुमत महायुतीला दिले असल्याचे माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितले.
राज्याचे स्वप्न साकार करायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असले पाहिजेत. अशी आमची भावना असल्याचे अमर साबळे यांनी सांगितले. राज्य सरकार स्थापन होण्याबाबत देखील साबळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले, सरकार स्थापन करताना नेत्यांशी सुसंवाद, मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप, आगामी धोरण या सर्वांवर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागतो. आम्हाला विचारपूर्वक काम करायचे आहे. त्यामुळे सरकार स्थापन व्हायला वेळ लागतोय.
मात्र ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती अमर साबळे यांनी दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, माऊली चवरे, विशाल वाळुंजकर, राजकुमार जठार, रमेश खारतोडे, संतोष कांबळे, विजयकुमार वानकर, चंद्रकांत सरवदे, गौतम सरवदे, संतोष मोरे, तानाजी वायाळ, विकास मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो: नीरा नरसिंहपूरात अभिषेक घालताना माजी खासदार अमर साबळे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा