स्वतंत्र सेनानी अबुल कलाम भारतरत्न
पहिले शिक्षणमंत्री तत्त्ववेत्ता वक्ते विद्वान ॥धृ॥
खिलाफत असहकार चळवळीत भाग घेतला
स्वातंञ्यासाठी तुरुंगात ञास सहन केला
स्वातंत्र्यासाठी केले कौटुंबिक जीवन बलिदान॥१॥
अल हिलाल अल-बलाग पत्रिका चालवत
इंग्रजां विरुद्ध जागरूकता निर्माण करत
तुर्की फारसी उर्दू अरबी भाषेचे होते ज्ञान॥२॥
बिकट परिस्थितीत शिक्षणाचा केला प्रसार
भाषणे' लेखणातून इंग्रजांवर केला प्रहार
स्वातंत्रउत्तर मिळाला शिक्षणमंत्री होण्याचा मान॥३॥
शैक्षणिक संशोधन क्षेत्रात केल्या सुधारणा
संगीत नाट्य साहित्य कलेस दिली चालना
AICTE UGC IIT IISC वैज्ञानिक तांत्रिक संस्था केल्या निर्माण॥४॥
अनिसा सिकंदर'दौंड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा