Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

नरसिंहपूर येथे बेकायदा वाळूचा उपसा करणाऱ्या दोन बोटीवर जप्तीची कारवाई

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

----- भिमा नदीत नरसिंहपूर येथून बेकायदा वाळूचा उपसा करणाऱ्या दोन सक्षन पाईपसह बोटीवर तहसीलदार जिवन बनसोडे, बावडा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्यासह महसूल व पोलीसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत बोटी जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. संबंधित जबाबदार कोणी पुढे आले नसल्याने अद्यापी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे तहसीलदार जिवन बनसोडे यांनी सांगितले. सदरची कारवाई सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती.

    नरसिंहपूर येथील भिमा नदीत नरसिंहपूर - शेवरे यांना जोडणाऱ्या पुलालगतहून शेवरे बाजूकडील बोटीतून नरसिंहपूर येथील वाळूचा बेकायदा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार जिवन बनसोडे यांना मिळाली. त्यानूसार आज बावडा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, हवालदार जगन्नाथ कळसाईत, पोलीस मोरे तर महसूल गौण खनिजचे बाळासाहेब मोहिते, मंडलाधिकारी ढाणे साहेब, तलाटी अमोल हजगुडे, राजाभाऊ पिसाळ, विठ्ठल दुपारगुडे, कोतवाल तात्या वाघमोडे, संग्राम बंडगर यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

     शेवरे (ता.माढा) बाजूकडून नरसिंहपूर बाजूकडील पुलालगतहून यांत्रिक बोटीद्वारे वाळूचा बेकायदा उपसा करणाऱ्या सक्षन पाईपसह बोटीवर आज इंदापूरचे तहसीलदार जिवन बनसोडे व बावडा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दोन बोटी जप्त करून क्रेनच्या सहाय्याने हायवा ट्रकमध्ये भरून तहसील कार्यालयात ठेवण्यात आले. सदरची कारवाई पाहण्यासाठी भिमा नदीवरील पूलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

चौकट - माढा तालुक्यातील शेवरे येथून पाच यांत्रिक बोटीद्वारे वाळूचा बेकायदा उपसा होत आहे. परंतू त्यातील दोन बोटी इंदापूर तालुक्याच्या हद्दीत घुसून वाळू उपसा करत असल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. परंतू अद्यापी तीन बोटी शेवरे बाजूकडे बेकायदा वाळू उपसा करत असूनही माढा तहसीलदार कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का असा अनेक जाणकार नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

फोटो - नरसिंहपूर येथून बेकायदा वाळूचा उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी जप्त करून घेवून जाताना.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा