*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
श्री श्री रविशंकर संचलित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अकलूज येथील साधकांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे यांच्या आवाहनानुसार मतदानाचा टक्का वाढवा,लोकांमध्ये मतदानाबद्दल उत्साह वाढवा यासाठी मतदान जनजागृती शपथ घेतली. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान करावे यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग साधकांनी रविवारी मतदान जनजागृती शपथ घेतली. अध्यात्मिक सद्गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी सुदर्शन क्रिया,योग प्राणायाम यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक एकत्र येतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक प्रा. धनंजय देशमुख यांनी 'आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून धर्म,जात यांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणार अशी शपथ योग साधकांना दिली. यावेळी उपस्थित साधकांनी भारत मातेच्या घोषणेसह मी मतदान करणार-तुम्ही करा,मतदार राजा जागा हो...लोकशाहीचा धागा हो..अशाही घोषणा दिल्या. यावेळी योगशिक्षक विजय मिसाळ,माळशिरस तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,सत्यवान सुर्यवंशी,प्रवीण खराडे पाटील,डॉ.अभिमन्यू चव्हाण,संजय जगदाळे,विठ्ठल कचरे यांच्या सह अनेक साधक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा