Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

*अकलूज येथील शिक्षक पतसंस्थेत. "रंगली दीप स्वरसंध्या "कार्यक्रम संपन्न . ‌. ‌दीपावलीनिमित्त सागीतिक उपक्रम*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथील माळशिरस तालुका प्रतिनिधी शिक्षक सहकारी पतसंस्था अकलूज व माळशिरस तालुका स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी दीपावली सणाचा आनंद द्विगुणीत करणारा दीप स्वर संध्या हा संगीतिक भावपूर्ण उपक्रम संपन्न झाला.



      भाऊ सुरांच्या सुश्राव्य स्वरात आणि वरून राजाच्या रौद्र संगीताचा सत्तेमध्ये रंगलेल्या या सांगीतिक उपक्रमात माळशिरस तालुक्यातील पुष्प शास्त्रीय संगीत गायक वादक शिक्षक बंधू भगिनींसह आठ वर्षांपासूनच्या बाल गायक कलाकारांनी ही सुष्राव्य स्वर अळवले.या मैफलित भावगीत, भक्ती गीत,अभंग,गवळण,नाट्य गीतामधून सुमधुर स्वर रंग भरणारे प्रसिद्ध तबलावादक ह.भ.प.बाबा महाराज ढवळीकर उर्फ भगवंत कदम,गायक आणि वादक रामचंद्र पारसे,जितेंद्र धाईंजे,शिवलिंग नकाते,लता निंबाळकर,आत्माराम गायकवाड,संतोष महामुनी, संजय पाठे,स्नेहा शिंदे,निषाद गाडेकर,महेश गाडेकर,नवगिरे सर, श्रीमंत गुंड,उमाजी माने, संग्राम दळवी,स्वरा गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला होता.

          गेल्या वर्षी तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने दिवाळी पहाट गाणी उपक्रम सुरू झाला होता.यावर्षी अनेक रसिक शिक्षकांना याचा आस्वाद घेता यावा म्हणून दीप स्वर संध्याक्रमांमधून शोध यांना सांगीतिक मेजवानी मिळाली.

कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ,स्वाभिमानी परिवाराचे मार्गदर्शक मंडळ, विविध संघटनांचे पदाधिकारी, सेवानिवृत्ती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,केंद्रप्रमुख,

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आणि शिक्षक बांधव उपस्थित उपस्थित होते.पतसंस्थेने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून कार्यक्रमास शुभेच्छा आहेत असा भ्रमणध्वनीव्दारे संदेश जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांनी कार्यक्रमास दिला.अष्टपैलू सुप्रसिद्ध निवेदक सुहास उरवणे यांचे संगीत निरूपणस्तरीय निवेदनाला राजाराम गुजर व कैलास गायकवाड यांची साथ मिळाली.संस्थेच्या वतीने उपस्थित गायक वादकांचे सत्कार संपन्न झाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ,स्वाभिमानी परिवाराचे कार्यकर्ते आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा