Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

*पालखी मार्गावरील सराटी ता. इंदापूर ते माळीनगर दरम्यानचा अकलूज कडे जाणारा रस्ता धोकादायक ---अपघात होण्याची शक्यता? गतिरोधक तातडीने बसविण्याची गरज*

 


*संपादक -- हुसेन मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

संपूर्ण वर्षभरात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी वारकरी भाविक चार वाऱ्या करत असतात त्यापैकी सर्वात मोठी ही" आषाढी वारी" असते आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्नाटका आंध्र प्रदेशातून भाविक या आषाढी वारीत लाखोच्या संख्येने सहभागी होत असतात आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वराची पालखी जात असते आणि देहू ते पंढरपूर संत तुकाराम महाराजांची पालखी जात असते या दोन्ही पालखी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील सराटी ते सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील माळीनगर दरम्यान पालखी मार्ग अंशतः 



पूर्ण झालेला आहे अद्याप माळीनगर येथील उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत आहे मात्र सराटी ते माळीनगर दरम्यानचा पालखी मार्ग मृत्यूचा सापळा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही? कारण माळीनगर हून सराटी इंदापूर कडे जाणारी वाहने भरघाव वेगाने जातात आणि अकलूज होऊन माळीनगर कडे जाणारी वाहने भरगाव वेगाने धावतात त्यामुळे माळीनगर कडून येणारे वाहन आणि अकलूज कडून माळीनगर कडे जाणाऱ्या वाहनांचे गतिरोधका अभावी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तेथे छोटसं सर्कल आहे मात्र नवजीवन हॉस्पिटल कडून माळीनगर कडे जाताना पालखी मार्गावर प्रवेश करण्यापूर्वी तेथे गतिरोधकाची आवश्यकता असून गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे तरी पालखी मार्गावरील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन येथे गतिरोधक बसवून होणारी जीवित हानी टाळता येऊ शकते तसेच पालखी मार्गावरून अकलूजहून माळीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवजीवन हॉस्पिटल समोरील चढावर रोडच्या दोन्ही बाजूला अद्याप संरक्षित गार्ड. बसवले नसल्याने एखादा नवीन वाहन चालक या गार्ड अभावी असलेल्या खड्ड्यात जाण्याची दाट शक्यता आहे असे वाहनचालकांमधून बोलले जात आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा