*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
कलबुर्गी (गुलबर्गा) येथील सुफी संत बंदानवाज यांचे वंशज डॉ. खुसरोसाहेब यांचे काल कर्नाटक राज्यातील गुलबर्गा शहरात निधन झाले. मृत्यू समय ते 80 वर्षाचे होते गुलबर्गा येथील बंदानवाज दर्गाह ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये सुरु केली असून. दर्गाह ट्रस्टच्या व्यवस्थापनात अनेक बदल करून, नव्या आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी ट्रस्टचा पैसा मोठ्या प्रमाणात सामाजिक कामासाठी वापरला. त्यांच्या या प्रयत्नामुळे शेकडो तरुण-तरुणी डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक झाले असून साहेब यांच्यामुळे त्यांचा रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागला , आणि हे सर्व साध्य झाले ते डॉक्टर खुसरोसाहेब यांच्या शैक्षणिक चळवळीमुळेच. स्वतः खुसरो बाबा हे सुफी चळवळीचे अभ्यासक होते. त्यांनी सुफी चळवळीवर पीएचडी केली होती. खुसरो बाबा यांच्या जाण्याने नुसत्या सुफी चळवळीची नाही तर मानव जातीचा आणि सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राचीदेखील मोठी हानी झाली आहे.
गुलबर्गा येथील दर्गा परिसरात त्यांचा दफन विधी झाला त्यांच्या अंत्यविधीत हजारोच्या संख्येने शिष्यगण व चाहते यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली
ॲड.एम जी तांबोळी अकलूज, सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा