*बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी
*मोबाईल 8378876123*
----- इंदापूर तालुक्याचा दुधाचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा बेरोजगारी, आरोग्य, विज, पाणी व ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकवेळ मदत करा जनतेचा सेवक म्हणून सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन परीवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रविण माने यांनी केले
नरसिंहपूर परीसरातील गावात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रविण दशरथ माने यांच्या प्रचारार्थ आयोजित घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब चौरे, मयुरसिंह पाटील, उमेश घोगरे, विजय घोगरे, नागेश गायकवाड, विजय गायकवाड, अभिजित घोगरे, नवनाथ माने, बाळासाहेब कोकाटे, कल्याण भंडलकर, हनुमंत काळे, चंद्रकांत सरवदे, महेंद्र परकाळे, महेश क्षिरसागर, किसन जावळे, नामदेव बोडके, बालाजी बोडके, नौशाद शेख, बच्चन सरवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रविण माने पुढे म्हणाले, आजी माजी आमदारांना तीस वर्षांत उद्योग, बेरोजगारी, आरोग्य, विज, शेती, ऊस व पाण्याचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. एक वेळेस मला सेवा करण्याची संधी द्या तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमचा सेवक म्हणून काम करेन. तालुक्यात ३५०० कधी कारखाना काढून ऊसाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल. तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत टेक्सटाइलसह विविध उद्योग आणण्यासाठी कटिबद्ध असून यातून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
मयुरसिंह पाटील म्हणाले, आजी माजी आमदारांच्या जाचाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे या निवडणुकीत परीवर्तन करण्यास सज्ज झाली आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली असून १९९५ ची पुनरावृत्ती होऊ घातली असून त्याचे आपणही साक्षिदार व्हावे. यापुढील काळात उद्योग, धंदे बरोबर, शिक्षण व सहकाराचे जाळे निर्माण करण्याचे काम करणार आहे. निरा भिमा कारखान्याच्या माध्यमातून परीसरात राजकारण सुरू आहे.
यावेळी विजय घोगरे, उमेश घोगरे, विजय गायकवाड, चंद्रकांत सरवदे, बालाजी बोडके, समाधान क्षिरसागर आदिंची भाषणे झाली. गणेशवाडी, टनु, नीरा नरसिंहपूर, गिरवी, पिंपरी बुद्रुक आदि गावात घोंगडी बैठकाची आयोजन करण्यात आले होते. गावोगावी परीवर्तन विकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
फोटो - टणू येथे आयोजित घोंगडी बैठकीत बोलताना प्रविण माने.
२) पिंपरी बुद्रुक येथील पिरसाहेब दर्गाहमध्ये मजारवर फुलांची चादर चढवण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा