Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

*काँग्रेस युद्धात जिंकली मात्र तहात हरली*


 *सांगली--- पत्रकार*

*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

*मो.8983 587 160*

काँग्रेस चा पराभव काँग्रेसचं करू शकते  यावर 2024 च्या  सांगलीच्या विधानसभेच्या पाश्वभूमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ  असलेल्या वसंतदादा पाटील  घराण्यावर आतापर्यंत काँग्रेस ने केलेला अन्याय, "दुर्लक्ष" यामुळेच मदनभाऊ पाटील आणि विशाल पाटील  यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध "अपक्ष" तुल्यबळ लढत देत अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विजय मिळवावा लागला.असो,

लोकसभा निवडणुकीमध्ये असलेले बदलाचे वारे आणि भाजपा विरोधी असणारा कौल अजूनही तसाच "ताजा" असताना,काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील नगरसेवक, कार्यकर्ते , विशाल पाटील यांचा गट आणि विशेषतः मदनभाऊ पाटील यांना मानणाऱ्या  बलाढ्य गटाला डावलून पृथ्वीराज पाटील यांना "उमेदवारी"  दिली. 

10 वर्ष केलेले "सातत्यपूर्ण" कार्य आणि 6600 मताने झालेला पराभव या गुडविल वर पृथ्वीराज पाटील यांनी आपली "दावेदारी" पुढे रेटली. परंतु काँग्रेस पक्षाने जनतेचा "कौल" आणि जयश्री पाटील गटाने गांभिर्याने केलेली मोर्चेबांधणी दुर्लक्षित केली. परंतु जयश्री पाटील यांनी आपली अपक्ष  उमेदवारी कायम ठेवत अप्रत्यक्ष भाजप*l चा मार्ग  सुकर केला.

"अभी नहीं तो कभी नहीं." .या दृष्टीकोनातून मदनभाऊ यांचे जावई जितेश  कदम याचा विधानसभेचा भविष्यातील राज्याभिषेक देखील मजबूत  केला.

खासदार विशाल पाटील हें  जयश्री पाटील यांच्यासाठी तिकीट आणण्यासाठी असमर्थ ठरले, काँग्रेस ने पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत  उमेदवारी दिली असताना देखील त्यांनी जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेत काँग्रेस पक्षश्रेष्ठीना ठेंगा दाखवत जयश्री पाटील याच महाआघाडीच्या उमेदवार असल्याचे "घोषित" केले. 

जयश्री पाटील यांनी लोकसभेत विशाल यांना विजयासाठी अनमोल आणि प्रामाणिक मदत केली.त्याची परतफेड म्हणून विशाल यांनी जयश्री पाटील यांना विजयश्री  मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करतील. आज मतविभागणी ची टांगती तलवार पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्यावर आहे. कारण दोघांना "मानणारा"  वर्ग सांगलीत आहे.

गेल्यावेळी मिळालेल्या 87000 मतांपैकी 50-50% मतविभागणी होऊन "काँग्रेस" चा "पराभव"  झाल्यास काँग्रेस चा पराभव काँग्रेसचं करू शकते ही म्हण सर्वार्थाने  पुन्हा एकदा "रूढ"  होईल.



 *सुधीर गाडगीळ निश्चितं !*


सुधीर गाडगीळ यांच्यासाठी ही तिहेरी लढत  अतिशय सोपी ठरली आहे. उत्कृष्ठ संघटन आणि जबरदस्त आखणी त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत रोखणे अवघड दिसतं आहे. त्यामुळे  भाजपा आणि संघपरिवार काँग्रेस च्या फाटाफुटीचा आसुरी आनंद घेण्यात मग्न आहे. सांगलीची आणि मिरजेची जागा या भाजपाला बहाल झाल्या आहेत . 

जनतेची नस पाहण्यात आलेली चूक आणि  जयश्री पाटील यांचेकडून बंड झाल्यास होणारे "परिणाम"  याचा न आलेला "अंदाज"  यामुळे आज काँग्रेस युद्धात जिंकली आणि तहात हरली आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.                 


. *इकबाल  बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा